…म्हणून आमिर खानची मुलगी ‘इरा’ होतेय ‘ट्रोल’

मुंबई : वृत्तसंस्था  – बॉलिवूडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडिया वर ट्रोल होत असताना. नेटकऱ्यांनी आता अभिनेता आमीर खानची मुलगी इराला तिच्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा ट्रोल केले आहे. आमीर आणि इरा या बापलेकीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
या फोटोमध्ये आमीरने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि पँट घातल्याचं दिसत आहे, तर इराने ब्लॅक अँड व्हाईट स्लीव्हलेस नेकटॉप घातला असून त्याखाली पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स घातल्या आहेत. बापलेक एकमेकांची गळाभेट घेत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
मात्र इराचा हा फोटो काही जणांना आवडलेला नसून. इराच्या कपड्यांवरुन काही जणांनी तिला ट्रोल केलं आहे. चारचौघांत वावरताना पाय आणि दंड उघडे ठेवल्याबद्दल काही जणांनी आक्षेप घेतला आहे. तर, इराने त्वचेचं जाहीर प्रदर्शन केल्याबद्दल काही यूझर्सनी मौलवींना तिच्याविरोधात फतवा काढण्यासही सुचवलं. तोकडे कपडे घातल्याबद्दल इरा खानला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अर्थात सर्वांनीच इरावर टीकेची झोड उठवलेली नाही. काही जणांनी इरा खान ‘बोल्ड अँड ब्यूटीफूल’ असल्याचं म्हटलं, तर कोणाला इराकडे पाहून क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहचा भास झाला.
सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करण्याची इराची ही पहिलीच वेळ नसून. यापूर्वीही आमीर खानसोबतच्या एका फोटोमुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.
You might also like