आमिर खानचा ‘हा’ सिनेमा झाला होता सुपरहिट, निर्मात्यानं दिले होते फक्त 11 हजार !


पोलिसनामा ऑनलाइन –
बॉलिवूड स्टार आमिर खाननं 30 वर्षांपूर्वीच्या करिअरमधील काही गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. यावेळी त्यानं अनेक सिक्रेट्स सांगितले आहेत. यात आमिरनं त्याच्या पहिल्या कमाईबद्दलही सांगितलं आहे. मुंबईच्या लोकलमधून फिरणं याबद्दलही तो बोलला आहे.

https://www.instagram.com/p/Bx2SFJbBrjF/

आमिर खाननं सांगितलं की, “कयामत से कयामत तक हा माझा पहिला सर्वात हिट सिनेमा होता. तेव्हा माझ्याकडे कार खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. मी पब्लिक ट्रान्सपोर्टनं फिरत असे. या सिनेमातील कामाचे मला 11 हजार रुपये मिळाले होते.” हा आकडा वाचल्यानंतर अनेकजण नक्कीच चकित झाले असतील यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/Bw6f-tbBlyW/

हाच तोच आमिर खान आहे ज्याच्या गजनी सिनेमानं 100 कोटीच्या क्लबची सुरुवात केली होती. या मुलाखतीत बोलताना आमिर खाननं याबबातही खुलास केला आहे की, त्याच्या पहिल्या सिनेमानंतर त्याला एक हजार रुपये प्रतिमहिना मिळायला सुरुवात झाली होती.

https://www.instagram.com/p/Bu_cbrSBY3F/

30 वर्षांच्या करिअरमध्ये आमिर खान कधी अवॉर्ड शोजमध्ये गेला नाही. परंतु त्याला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. पद्म श्री पद्म भूषण असे पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/BvTOMwnBgoK/

आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर आमिर खान लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसणार आहे. 1994 मधील हॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमा ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक म्हणजे लाल सिंह चड्ढा हा सिनेमा आहे. फॉरेस्ट गंप या सिनेमात टॉम हँक्स यांची प्रमुख भूमिका होती. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चन्दन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या अभिनेत्री करीना कपूर आमिरसोबत काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bqm9jr_gaGc/