अामिर खानची पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी (दि.१०) पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांच्याशी त्याने सुमारे पाऊण तास चर्चा केली. आमीर खानच्या “पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम बालेवाडी येथे काही दिवसांत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’221be4cf-9cbf-11e8-bcbe-4b7163c90ed5′]

आमीर खान आयुक्तालयात आल्याची खबर मिळाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आमीर खान बाहेर पडताच अनेकांनी त्याच्याबरोबर छायाचित्र आणि “सेल्फी’ची हौस भागविली.

त्यानेही कोणतेही आढेवेढे न घेता सर्वांना छायाचित्र काढण्याची संधी दिली. आमीर खानच्या “पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम बालेवाडी येथे काही दिवसांत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
You might also like