विधानसभा 2019 : आम आदमी पार्टीकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुंबई-पुण्यातील जागांचा समावेश (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली असून काही पक्षांनी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. वंचित आणि एमआयएम आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएमने उमेदवारांची यादी जाहीर केली. तर संभाजी ब्रिगेडने देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधानसभेसाठी सर्वच छोट्या पक्षांनी उमेदावारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आज आम आदमी पक्षाने राज्यातील 8 उमेदवारांची जाहीर केली आहे.

आपने आज जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये ब्रह्मपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरी पूर्वसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरुडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वतीमधून संदीप सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

जनतेचा आवाज विधानसभेत पोहचविण्यासाठी राज्यातील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सरकारच दिसत नाही. सुशासनाचा वायदा करणाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात टाकला आहे. सगळेच भाजपात गेल्याने विरोधकच राहिला नसल्याचे मत आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

Visit : policenama.com