‘AAP का सिपाही हू’ ! CM केजरीवालांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचला ‘मफलरमॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे दिल्लीत पुन्हा एकदा सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून पन्नासहून अधिक जागांवर आपचे उमेद्वारा विजयाच्या वाटेवरती आहेत त्यामुळे पुन्हा एकदा केजरीवाल मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. मात्र भाजपने सर्व ताकद पणाला लावून देखील भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळताना दिसत नाही. तर काँग्रेसला या निवडणुकीमध्ये आपले खाते देखील खोलता आलेले नाही.

आपच्या कार्यालयामध्ये जोरदार आनंद साजरा केला जात आहे. कार्यकर्त्यांकडून लाडूची ऑर्डर देण्यात आली आहे, तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने केजरीवालांच्या घराबाहेर गर्दी करून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच एक चिमुकला हुबहुबी केजरीवालांप्रमाणे गळ्यात मफलर टाकून डोक्यावर आपची टोपी घालून शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत एक ट्विट देखील पक्षाच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आले आहे.

हा चिमुकला मफलरमॅन म्हणून ओळखला जातो. दिल्लीमध्ये आम्ही पाच वर्षांमध्ये अनेक चांगली कामे केली आहेत त्यामुळे आमचा विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे असे मत मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like