AAP च्या ‘थीम सॉन्ग’ विरुद्ध निवडणूक आयोगाकडे गेली BJP, 500 कोटींच्या मोबदल्याचा केला ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’च्या ‘लगे रहो केजरीवाल’ हा व्हिडिओ तयार केला असून त्यात दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष अभिनेते मनोज तिवारी यांच्या भोजपुरी चित्रपटातील गाण्याचा वापर करण्यात आला आहे. याबाबत भाजपाने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली असून मुख्यमंत्री केजरीवाल यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवून ५०० कोटी रुपयांचा दावा केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जोर आता वाढला असून आज भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘आप’ ने निवडणुक प्रचाराचे थीम साँग ट्विटर वर शेअर केले आहे. हे गाणे शेअर करताना म्हटले आहे की, ‘लगे रहो केजरीवाल’ हे गाणे इतके चांगले झाले आहे की, त्यावर स्वत: मनोज तिवारी सर सुद्धा नाचत आहे. भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.

दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी यावर सांगितले की, कलाकार म्हणून मी जे चित्रपट आणि गाणी केली आहेत. त्याचे क्लिपिंग आणि फोटो एडिट करुन आप च्या गाण्यावर लागून केजरीवाल यांनी आपले खोटेपणाचा पुरावा दिला आहे. आपल्या थीम साँगवर माझा फोटो लावून तो प्रसारित करण्याचा हक्क आम आदमी पक्षाला कोणी दिला. व्यावसायिक पातळीवर कोणीही परवानगीशिवाय फोटो वापरु शकत नाही, हे काय केजरीवाल यांना माहिती नाही का़ असा प्रश्न केला.

आपच्या या थीम साँगवर भाजपाच्या अनेक नेत्यांनी टिका करण्यास सुरुवात केली आहे. हा कॉपी राईट कायद्याचा भंग असल्याचे सांगून प्रदेश मिडियाचे सह प्रभारी नीलकांत बक्शी यांनी मनोज तिवारी यांच्या चित्रपट आणि गाण्यातील शॉट्सचा राजकीय वापर केला जात असून त्यासाठी चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक यांची परवानगी घेण्यात आलेली नाही, हे कायद्याचे उल्लंघन आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/