‘शिवराज्याभिषेक’ दिनासंबंधी भाजपाच्या बडया नेत्याचं ‘आक्षेपार्ह’ ट्विट, पुण्यात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्विट केले आहे. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्यभिषेक दिनासंबंधी एक ट्वीट केले आहे. यामध्ये शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा देताना या दिवसाला ‘हिंदू साम्राज्य दिवस’ घोषित करून शुभेच्छा दिल्या.

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आणि तत्कालीन दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात असल्याचे शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या पुस्तकावरून राज्यात मोठा वादंग झाला होता.

याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आदेश गुप्ता यांच्याविरुद्ध ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. आदेश शिंदे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आपतर्फे शुक्रवारी दिवसभर भाजप नेत्याविरुद्ध एक हॅशटॅग वापरून चांगलाच समाचार घेण्यात आला, अशी माहिती मुकुंद किर्दत यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like