…नाहीतर दिल्लीच्या रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील; ‘या’ आमदाराची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सध्या कोरोनाने उद्रेक केला आहे. दैनंदिन कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काही दिवसापूर्वी ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र वाढती संख्या पाहता हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे दिल्लीत अवस्था बिकट झालीय. यावरून आता दिल्लीत असणारे सत्ताधारी आप पक्षामध्येच गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. यावरून आप पक्षाचे मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी केलीय.

सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर आमदार शोएब इक्बाल यांनी दिल्ली हाय कोर्टाला विनंती करता राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी केलीय. दिल्लीमध्ये कोरोनामुळे अव्यवस्था पसरत आहे, या कारणाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, दिल्लीत कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना रुग्णालयात प्राणवायू . नागरिकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदत करू शकत नाही आहोत. पुढे ते ,म्हणाले, मी ६ वेळा आमदार राहिलो आहे. परंतु, कोणी ऐकत नाहीय. मला तर जय कोर्टाने दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अन्यथा इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील असे आमदार इक्बाल यांनी ,म्हटलं आहे.

या दरम्यान, आमदार शोएब इक्बाल म्हणाले, कोरोनाच्या संकटात आम्हाला केंद्र सरकारकडून काहीच सहकार्य मिळत नाहीय. यामुळे जर केंद्राच्याच हातात सर्व गेले तर काम होईल. ३ महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावावा असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी पेक्षा अधिक या वर्षी कोरोनाने हाल बेकार केलं आहे. प्राणवायूच्या टंचाईमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरु आहे. आता राज्य शासनाच्या आमदाराने यावर सवाल उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या या लाटेने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेचा गोंधळ उडाला आहे. नागरिकांना अधिक संघर्ष करून रुग्णालयात ना बेड मिळत आहे ना प्राणवायू. दिल्ली सरकार वेबसाईटवर बेड रिकामे असल्याचे दावे करत आहे, परंत्तू, प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक रुग्णालयात त्या सुविधेचा अभाव दिसून येतोय.