home page top 1

..म्हणून नितीश कुमार यांच्या पक्षाचा समावेश मोदींच्या मंत्रिमंडळात नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची घडी बसवण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात देखील आपल्या मित्रपक्षांना जागा देऊन त्यांना देखील खुश केले. मात्र या सगळ्यात त्यांचा बिहारमधील मित्रपक्ष जेडीयू मंत्रिमंडळात सहभागी झालेला नाही. काही घटनांचा विचार करता नीतीश कुमार योग्य वेळेची वाट पाहत असल्याचा तर्क देखील लावला जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर जेडीयुला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. पण, जेडीयुनं ऑफर नाकारत एनडीएसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर ते एनडीएतून बाहेर पडण्याचा देखील विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

या सगळ्यावर आता आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी भाष्य केले आहे. जेडीयूने मंत्रिमंडळात सहभाग का घेतला नाही याचे कारण त्यांनी यात सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना सन्मानजनक मंत्रिपद का मिळाले नाही यावर देखील भाष्य केले नाही. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळण्याच्या मागणीला जोर मिळू नये यासाठी त्यांना मंत्रिमंडळात सन्मानजनक पद दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

आपचे राज्यसभा सदस्य असलेले संजय सिंह यावेळी म्हणाले कि, नितीश कुमार बिहारमधे आपल्याला वरचढ ठरू नयेत म्हणून, त्यांना मंत्रिमंडळात कमी महत्वाचे खाते देण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यावेळी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले कि, भाजप राष्ट्रवादाबद्दल बोलते मात्र अभ्यास गुजरातवादाबद्दलचा चालू असतो, त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री त्या राज्याचे असल्यामुळे अदानी आणि अंबानी त्यांचे आवडते उद्योगपती आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आदमी पार्टी चांगली कामगिरी करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका 

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

Loading...
You might also like