दिल्लीनंतर आता बिहारमध्ये ‘अ‍ॅक्टीव्ह’ होणार ‘आप’, निवडणूकीत ‘नशीब’ अजमावणार AAP

पटणा : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे 11 फेब्रुवारीला लागणार आहे. यासोबतच सर्व एग्झिट पोल आम आदमी पार्टीला पुन्हा सत्तेत दाखवत आहेत. जर या निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगले यश मिळाले तर याचा थेट परिणाम बिहार विधानसभा निवडणुकीवर होताना दिसणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचे लक्ष आता बिहार निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुका 7-8 महिन्यात होणार आहेत. बिहारमध्ये आम आदमी पार्टीला अजून मोठा जनाधार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला एकही जागा मिळाली नव्हती. आम आदमी पार्टीने किसनगंज, भागलपुर आणि सीतामढीच्या 3 जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु यश मिळाले नव्हते. 2015 मध्ये आम आदमी पार्टीने एकही उमेदवार उभा केला नव्हता, परंतु भाजपाविरोधी आघाडीला पाठींबा दिला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपने 39 जागांवर निवडणुक लढवली होती. मात्र यश मिळाले नव्हते.

बिहारमध्ये आपचे मुख्य सचिव शत्रुघ्न साहू यांनी दिल्लीहून परतल्यानंतर म्हटले की, पार्टीने बिहार विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने जनसंवाद यात्रेदरम्यान बिहारमध्ये संघटन मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. मीडिया पक्षाला जागा देत नसला तरी जनतेकडून समर्थन मिळत आहे, असे साहू म्हणाले.