आपका डॉक्टरतर्फे पोलिसांना दिले फेस शिल्ड

पुणे : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी आपका डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनमधील पोलिसांना पूर्ण चेहरा झाकणारे (फेस शिल्ड) देण्यात आले. तसेच डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नर्सिंग यांना पूर्ण चेहरा झाकणारे (फेस शिल्ड) वापरा असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त शंकर मांजरे, डॉ. सुहास लोंढे, नीलेश माणिकवार डॉ. उत्तम थोरबोले, अनिकेत लेंबे, साहेबराव काळे आदी उपस्थित होते.