जेव्हा आराध्यानं म्हटलं ‘धन्यवाद मिस’ ! व्हायरल झाला ऐश्वर्या-अभिषेकच्या मुलीचा ‘हा’ गोंडस ‘व्हिडीओ’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : अलीकडेच बच्चन कुटुंबीय कोरोना विषाणूमुळे अस्वस्थ झाले होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्या प्रकृतीसाठी देशभर प्रार्थना सुरू झाल्या. एकीकडे देश अमिताभसाठी आशीर्वाद मागत होते तर दुसरीकडे आराध्याबद्दलचे लोकांचे प्रेमही वाढले होते. दरम्यान पुन्हा एकदा आराध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

व्हिडिओमध्ये आराध्या ऑनलाईन क्लासेस घेताना दिसत आहे. एका स्लाइडमध्ये आराध्या आणि दुसर्‍या स्लाइडमध्ये तिचे शिक्षक आहेत. या झूम क्लास मध्ये आराध्या शाळेच्या गणवेशात दिसली. कुत्र्याची कहाणी वाचून क्लास संपल्यावर ती अतिशय प्रेमळपणे म्हणते – ‘धन्यवाद मिस’. आराध्याच्या या गोंडस व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नातीच्या बोलण्यावरून भावुक झाले होते आजोबा अमिताभ

आराध्या आणि तिचे आजोबा म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यात घट्ट बॉन्ड‍िंग आहे. अलीकडे आराध्या कोरोना निगेटिव्ह होऊन रुग्णालयातून परत येत होती तेव्हा तिने अमिताभ यांना लवकरच बरे होऊन घरी परतण्याचे आश्वासन मागितले. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्येही याचा उल्लेख केला आहे. अमिताभ यांनी लिहिले- ‘छोटी बिट‍िया आणि बहुरानी घरी गेले…आणि मी माझे अश्रू रोखू शकलो नाही…छोटी बिट‍िया मला सांगते रडू नका, तुम्ही लवकरच घरी येणार, मला विश्वास देते… मला तिच्यावर विश्वास ठेवावा लागेल.’

काही दिवसांनंतर अमिताभ देखील कोरोना निगेटिव्ह झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांच्या जाण्याच्या काही दिवसांनी शनिवारी अभिषेक देखील कोरोना निगेटिव्ह होऊन घरी परतले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like