आराध्या बच्चन होणार पंतप्रधान; ज्योतिषाची भविष्यवाणी

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन

अभिताभ आणि जया बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन पंतप्रधान बनणार अशी भविष्यवाणी हैदराबाद मधील डी ज्ञानेश्वर या एका ज्योतिषाने केली आहे. आजी आजोबा किंवा आई बाबा यांच्या अभिनय क्षेत्रातील मार्गावर न जाता ती करियर बाबत वेगळ्याच वाटेने जाईल असा दावा या जोतिष्याने केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार आराध्या हि अभिनय किंवा राजकारणात प्रगती करू शकेल पण जर तिचे नाव आराध्या ऐवजी रोहिणी ठेवल्यास तिला राजकारणात यश लवकर मिळेल आणि ती पंतप्रधान बनेल याचा तिला राजकारणात खूप फायदा होईल. अशी भविष्यवाणी ज्योतिषाने केली आहे.

यापूर्वी डी ज्ञानेश्वर यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल अचूक भविष्यवाणी केली होती. त्यांनी यावेळी ते राजकारणात येतील असे भाकीत केले होते आणि हे भाकीत काळाच्या कसोटीवर खरे ठरले. या गत रविवारी डी ज्ञानेश्वर यांनी अनेक भाकिते वर्तवलेली आहेत, त्यामध्ये रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार,अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार ,भारत व पाकिस्तान युद्ध होणार आणि येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार अश्या भाकितांचा समावेश यामध्ये केला आहे. त्यामध्ये बॉलीवूड ची सुपरक्युट स्टार किडस च्या यादीत नाव असलेल्या आराध्या बददलच्याही भाकिताचा समावेश आहे.

डी ज्ञानेश्वर यांनी सुपरस्टार रजनीकांतबद्दल वर्तवलेली एक भविष्यवाणी खरी ठरली. आणि आता आराध्याबद्दलचे त्यांचे भाकित किती खरे ठरते, हे तर काळचं ठरवेल. काही दिवसांपूर्वी आराध्या आईसोबत फिल्म फेस्टिवल मध्ये दिसली होती.