Coronavirus : ‘ट्रॅकिंग App’ पासून ‘हेल्पलाईन चॅटबोट’पर्यंत, ‘या’ आहेत ‘कोरोना’ व्हायरस संदर्भातील सरकारच्या सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. ज्यात आता स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन चॅटबोट लॉन्च करण्याची देखील तयारी सुरु आहे. यातील काही सेवा होम क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या लोकांना ट्रॅक करण्यासाठी आहे. तर काही कोरोनासंबंधित खोट्या बातम्यांचा खुलासा करत सामान्य माणसांना दिलासा देईल. काय आहे हे अ‍ॅप, जाणून घेऊयात.

आरोग्य सेतू –
आरोग्य सेतू एक ट्रॅकिंग अ‍ॅप आहे. जे केंद्र सरकारने नुकतेच लॉन्च केले आहे. या अ‍ॅपमध्ये जीपीएस सिस्टम आणि ब्लूटूथ ज्या माध्यमातून कोरोना व्हायरस संक्रमित प्रकरणांची माहिती मिळेल. आता प्रत्येक मोबाईलमध्ये जीपीएस सिस्टम अ‍ॅण्ड ब्लुटूथ सिस्टम असते. केंद्र सरकार या सुविधेद्वारे हे शोधू शकतात की कोणता व्यक्ती पेशंटच्या जवळ राहत आहे. हे अ‍ॅप 11 भाषांना सपोर्ट करतात.

WhatsApp ChatBot –
पंतप्रधान मोदींनी व्हॉट्सअ‍ॅप लॉचिंगची घोषणा केली होती. यातून लोकांना त्यांना हव्या असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोटच्या 919013151515 या नंबरवर फक्त HI असा मेसेज करायचा आहे. तुम्ही कोरोनासंबंधित आपल्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी MyGoverment Corona helpdesk ला देखील कॉल करु शकतात. येथे तुम्हाला कोरोनाची लक्षण आणि यासंबंधित चाचण्यांचे सेंटरची माहिती मिळू शकते.

कोविड – 19 फीडबॅक –
हे अ‍ॅप केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आले आहे याद्वारे लोक थेट फीडबॅक घेण्यात येतो. ज्यांच्यावर देशात कोरोनावर उपचार करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like