Aaron Finch | ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर एरॉन फिंचने (Aaron Finch) सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीच्या आधी त्याने निवृत्तीची घोषणा केली. एरॉन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने निवृत्ती जाहीर केली. यावेळी तो म्हणाला मला जाणीव झाली की मी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या संघात नसेन, त्यामुळे मला वाटलं की निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे.संघ व्यवस्थापनाला त्यांच्या ध्येयाच्या दिशेने तयारी करण्यासाठी वेळ मिळेल. मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानेन ज्यांनी या क्रिकेट कारकिर्दीत माझं समर्थन केलं आणि माझ्यासोबत उभे राहिले.

एरॉन फिंचची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द
एरॉन फिंचने (Aaron Finch) ऑस्ट्रेलियाकडून 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
यामध्ये 5 कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
फिंचने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 76 टी-20 सामन्यांचे नेतृत्व केले.
तसेच कर्णधार म्हणून 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. फिंचने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 तर टी-20 मध्ये दोन शतके झळकावली आहेत.
या सगळ्यामध्ये मिळून त्याच्या नावावर 8 हजार 804 धावा आहेत.
एरॉन फिंचने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Web Title :-Aaron Finch | aaron finch announces retirement from international cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या सलग छापेमारीमुळे गुटख्याचे बडे सप्लायर ‘निजाम’, ‘मलिक’, ‘मंदार’, ‘पंकज’, ‘सुजित’, ‘सागर’, ‘गुड्डू उर्फ साकीब’, ‘निखील’ सैरभैर

Mouni Roy | ग्रे बिकिनीत अभिनेत्री मौनी रॉय दिसतेय एकदम हॉट; फोटो पाहून चाहते घायाळ