‘कोरोना’ व्हायरसच्या भीतीनं टेस्ट करताना दिसली अभिनेत्री रश्मी देसाई, व्हिडीओ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बिग बॉस 13 ची स्पर्धक आणि नागिन 4 या मालिकेची अभिनेत्री रश्मी देसाई सध्या खूपच चर्चेत येताना दिसत आहे. रश्मीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर झापाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत रश्मी देसाई आपलं टेम्प्रेचर चेक करताना दिसत आहे.

खरं तर रश्मी देसाईचा हा व्हिडीओ नागिन 4 च्या सेटवरील आहे. नागिन 4 च्या सेटवर जाताना अशा प्रकारे चेकअप होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता ही खबरदारी घेण्यात आली आहे. सर्वांचं सेटवर येण्यापूर्वी चेकअप केलं जात आहे.

रश्मीचा हा टेम्प्रेचर चेक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इंस्टावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रश्मी देसाईचे चाहते ही हा व्हिडीओ वारंवार पहात आहेत. अनेकांनी यावर कमेंट केली आहे. नागिन या मालिकेची निर्माता एकता कपूर हिनंही रश्मीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिनं लिहिलं की, “आज शुटींग बंद होण्यापर्यंत नागिनची तपासणी केली जात आहे.” एकता कपूरच्या कमेंटनंही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/B8Di6x4gxeg/

https://www.instagram.com/p/B70xEBmgXnq/

https://www.instagram.com/p/B8a8t4Kg4-S/