नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी आरती सिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- औरंगाबाद ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे. आरती सिंग यांच्यासह इतर 4 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) काढले आहेत.

औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत असताना आरती सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी अनेक क्‍लिष्ट गुन्हयांचा पर्दाफाश केला आहे. आता त्यांची नाशिक ग्रामीण येथे अधीक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे. आयपीएस मोक्षदा पाटील (पोलीस अधीक्षक, वाशीम ते पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण), आयपीएस वसंत परदेशी (पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, औरंगाबाद ते पोलीस अधीक्षक, वाशीम) आणि पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम (पोलीस उपायुक्‍त, नागपूर शहर ते पोलीस उपायुक्‍त, पुणे शहर).

राज्यातील 3 पोलिस अधीक्षक, एका उपायुक्‍तांची बदली 
उपायुक्‍त संभाजी कदम यांची पुण्यात बदली 
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची नियुक्ती