‘त्या’ व्यावसायिक भागिदाराकडून क्रिकेटपटू सेहवागच्या पत्नीची साडेचार कोटीची फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागसोबत फसवणुकीचा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. आरती सेहवागने दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तिच्यासोबत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. आरती सेहवागने केलेल्या आरोपांनुसार, नाव आणि स्वाक्षरीचा चुकीचा वापर करून पार्टनरने साडे चार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं आहे.

पार्टनरने केला दुसऱ्या फर्मशी संपर्क

आरती सेहवागने केलेल्या आरोपांनुसार, त्यांनी दिल्लीच्या अशोक विहारमध्ये रोहित कक्कर नावाच्या व्यक्तीसोबत पार्टनरशिप केली. यानंतर रोहित कक्कर आणि त्याच्या काही जवळच्यांनी आरती सेहवागला चाहूल न लागू देता दुसऱ्या बिल्डर फर्मसोबत संपर्क साधला. या लोकांनी फर्मला सांगितले की, आरती आणि वीरेंद्र सेहवाग त्यांच्यासोबत आहेत.

कलम 420 नुसार गुन्हा दाखल

आरोपांनुसार, नाव आणि स्वाक्षरीचा चुकीचा वापर करून त्या फर्मकडून साडे चार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं आहे. आरती सेहवागचं म्हणणं आहे की, जेव्हा ती रोहित कक्करच्या फर्ममध्ये पार्टनर बनली होती तेव्हा तिने ठरवलं होतं तिच्या परवानगीशिवाय कोणतेही काम होणार नाही. सध्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सर्व आरोपींविरोधात कलम 420 नुसार केस दाखल केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या बाबत ट्विटरवरून ट्विट करून माहिती दिली आहे.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’