Aarya-2 Motion Poster | ‘आर्या 2’चं मोशन पोस्टर रिलीज, सुस्मिता सेनचं क्रूर रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क..!

0
104
Aarya-2 Motion Poster | aarya 2 motion poster release sushmita sen in dangerous look trailer will out tommorow
File Photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Aarya-2 Motion Poster | बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सुस्मिता सेन. सुस्मिताचं नुकतंच एका वेबसीरिजचं (Webseries) पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. (Susmita Sen) तिची ही आगामी सिरिज पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहे. (Aarya-2 Motion Poster)

 

 

 

‘आर्या 2’ हे या सिरिजचं नाव आहे. या सिरिजचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. (Aarya-2 Motion Poster) या पोस्टरमधून रसिक प्रेक्षकांना सुस्मिताची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे. ‘आर्या 2’ ट्रेलरमध्ये तिचं अगदी क्रूर रूप दाखवलं असून, इंटरनेटवर टिझरनं धुमाकूळ घातली आहे. शूटिंगबद्दल काही खास क्षण शेअर करताना सुस्मिता म्हणाली, “आर्याचा सीझन 2 हा अतिशय महत्वाचा सिक्वेन्स होता. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की, ऑफ सीझन असताना राजस्थानमध्ये पाऊस पडत नाही. परंतु शेवटी 24 मिनिटामध्ये या सीनमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडला, तोही फक्त आमच्यासाठी! त्यामुळे आम्हाला एक उत्तम बॅकड्रॉप स्कोअर मिळाल्यानं हा सीन आमच्यासाठी एक उत्तम हाय पॉईंट झाला. म्हणून तो दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आणि अविस्मरणीय राहिल.”

 

 

दरम्यान, सुस्मितानं बऱ्याच कालावधीनंतर ‘आर्या 2’मधून अभिनयात पुनरागमन केलं आहे.
तसेच 2020 मध्ये ‘आर्या’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ती प्रचंड लोकप्रिय वेबसिरिज बनली होती.
तसेच राम माधवानी यांने देखील या सिरिजमधून वेबविश्वात पदार्पण केलं आहे.
ही सिरिज लवकरच डिज्नी-हॉटस्टारवर (Disneyplus Hotstar) प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

Web Title :- Aarya-2 Motion Poster | aarya 2 motion poster release sushmita sen in dangerous look trailer will out tommorow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा