माझ्या गाण्यामुळे मिळालेली मतं परत करा, ‘या’ गायकाची भाजपाकडे मागणी 

गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाम मधील २०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. सध्या आसाममध्ये नागरिकता संशोधन विधेयक -२०१६ ला जोरदार विरोध केला जात आहे यात आसामी गायक जुबीन गर्ग यांनी देखील सहभाग आहे. या गायकाने २०१६ साली भाजपच्या प्रचारासाठी गायलेल्या गाण्यामुळे जी मतं मिळाली ती परत करा अशी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी फेसबुक पोस्टवरून केली असून यासाठी भाजपने दिलेला मोबदलाही परत करण्याची तयारी असल्याचे जुबीन यांनी म्हटले आहे.
जुबीन यांचे फेसबुकवर ८.५६ लाख फॉलोअर्स असून ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट त्यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना उ्ददेशून लिहली आहे. कारण जुबीन यांनी आधीही मुख्यमंत्रांना पत्र लिहले होते. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट टाकली आहे.
काय आहे जुबीन यांची फेसबुक पोस्ट 
 “प्रिय सर्बानंद सोनोवाल दा. काही दिवसांपू्र्वी मी तुम्हाला एक पत्र लिहलं होते. पण तुम्ही कदाचित काळे झेंडे मोजण्यात दंग होतात. म्हणून सांगतोय की सध्या राज्यभरात विरोध प्रदर्शन सुरू असून सगळीकडे काळे झेंडे फडकत आहेत.म्हणूनच मी ती मत पुन्हा घेऊ शकतो का जी माझ्या गाण्यामुळे 2016 साली तुम्हाला मिळाली होती”. त्यासाठी तुम्ही दिलेला मोबदलाही मी परत करण्यास तयार आहे. असे जुबीन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
४०  हून अधिक संघटना  विरोधात सामील 
जुबीन यांनी ८जानेवारीला सोनोवाल यांना सात दिवसात विधेयक मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आसाममध्ये ४०  हून अधिक संघटना नागरिकता संशोधन विधेयकास विरोध करत आहेत. २०१६ मध्ये लोकसभेत नागरिकता अधिनियम 1955 मध्ये बदल करण्यासाठी आणण्यात आले. या विधेयकात अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू , शीख,बौध्द,जैन ,पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना कुठलेही कायदेशीर दस्ताऐवज नसतानाही हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यास अनेक संघटनांचा विरोध आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like