धक्कादायक ! डॉक्टरांना मुत्राशयात सापडली केबल, मोबाइल चार्जरने हस्तमैथुन केल्याचा ‘प्रताप’ (व्हिडीओ)

गुवाहाटी : वृत्तसंस्था –   लैंगिक सुखासाठी एखादी व्यक्ती असे काही करू शकेल याची कल्पना देखील कोणी केली नसेल. मात्र, आसाममधील एका व्यक्तीने प्रत्यक्षात जे काही केले ते पाहून डॉक्टरांना देखील धक्का बसला. या व्यक्तीने हस्तमैथुनासाठी मोबाइल चार्जरच्या केबलचा वापर केला. डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यावर मूत्राशयात केबल सापडली आणि या व्यक्तीचा प्रताप समोर आला.

एक 30 वर्षाची व्यक्ती डॉक्टरांकडे पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन आला. या व्यक्तीने आपण चुकून मोबाइल हेडफोनची केबल गळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या मलाची तपासणी केली, तसेच एन्डोस्कोपीही केली परंतु त्यांना अन्ननलिकेत, पोटात केबल सापडली नाही. अखेर डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या मूत्राशयात मोबाइलची चार्जरची केबल आढळून आली. या व्यक्तीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर इस्लाम यांनी याची माहिती सोशल मीडियावर सविस्तर दिली आहे.

Surprises in Surgery! After 25 years of experience in Surgery, I continue to be surprised and shocked by instances…

Geplaatst door Wallie Islam op Woensdag 3 juni 2020

डॉ. इस्लाम यांनी सांगितले की, 30 वर्षाची व्यक्ती ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन माझ्याकडे आली. आपण चुकून मोबाइल हेडफोन गिळल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार आम्ही त्याच्या अन्ननलिकेची तपासणी केली. परंतु त्यात काही आढळून आले नाही. ही केबल मूत्राशयात असल्याचे दिसून आले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीला लैंगिक सुखासाठी केबल आणि इतर वस्तू पेनिसमध्ये टाकण्याची सवय आहे. हा हस्तमैथुनाचा प्रकार आहे. त्याला Urethral sounding असं म्हणतात. ज्या मूत्रमार्गात एखादी वस्तू किंवा द्रव टाकलं जातं. मात्र या व्यक्तीने ठरवल्याप्रमाणे काही झालं नाही उलट ही केबल त्याच्या मूत्राशयात गेली. त्यानंतर पाच दिवसांनी ही व्यक्ती आमच्याकडे आली आणि केबल गिळल्याचं वारंवार सांगू लागली. रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like