‘त्या’ आमदारसह अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर जणू राजकीय भूकंपच आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार हे देशमुखांसोबत बातचीत करणार असे वृत्त असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ‘आम्ही आशिष देशमुख तसेच इतर नाराज नेत्यांच्या संपर्कात’ असल्याचे सांगितले आहे . एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भाजपला रामराम करणाऱ्या आशिष देशमुख यांच्याप्रमाणे इतर प्रमुख पक्षातीलअनेक नाराज आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वाहिनीशी बोलताना केला आहे. सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत, हळूहळू ते तुम्हाला दिसेल, असं संजय राऊत म्हणाले. यामुळे इतरांचे आमदार फोडणाऱ्या भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31374781-c6fa-11e8-b940-65b82dca6211′]

शिवसेनेला तडा नाहीच

संजय राऊत म्हणाले की, “भाजपने शिवसेनेत गळ टाकला आहे आणि 17,18,20 आमदार गळाला लागले आहे, असं म्हटलं जात आहे. पण शिवसेनेला तडा जाऊच शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अभंग आणि मजबूत आहे. ज्यांनी या बातम्या सोडल्या, चलबिचल केली, त्यांचेच आमदार, खासदार आज सोडून जात आहेत. त्यांच्याच पक्षात अस्वस्थता आहे.”

आशिष देशमुखांसारखे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा प्रश्न विचारला असता राऊतांनी सांगितलं की, “हो आहेत, महाराष्ट्रील प्रमुख पक्षातील अनेक आमदार, महत्त्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहत आहेत. त्यात अनेक मोठी नावं आहेत, योग्य वेळी तुम्हाला कळेल.” असे देखील राऊत म्हणाले.

[amazon_link asins=’B07BCGC13F,B016115VXW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ecb9778-c6fb-11e8-bf51-61cbf89b1c18′]

आंबेडकर-ओवेसी युती म्हणजे भाजपची बी टीम

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची युती म्हणजे भाजपची ‘बी टीम’ आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. वंचित बहुजन आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

[amazon_link asins=’B00V0II33M,B00QX3Y6IA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b49ae01-c6fb-11e8-981e-9f9c94063959′]