मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भाजपच्या ‘या’ बडया नेत्यानं केली हात जोडून विनंती, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवं सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत सांगितले की आरे मेट्रो कार शेडला स्थगिती देण्यात आली आहे. आरेतील रात्रीत होणारी वृक्षतोड आणि पर्यावरण प्रेमीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला. परंतू पहिल्या दिवसापासून महाविकासआघाडीवर तोफ डागणाऱ्या भाजपकडून या निर्णयावर टीका करण्यात आली. एवढेच काय तर भाजप नेते अशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

अशिष शेलार यांनी चिंता व्यक्त केली की सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च तर वाढेलच शिवाय या प्रकल्पांना प्रचंड विलंबही होणार आहे. या निर्णयातून एखाद्याचा अहंकार साधला जाईल. परंतू जनहित मात्र साधले जाणार नाही. केवळ अहंकारापोटी असे करु नका ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे.

अशिष शेलार म्हणाले की, मेट्रो पर्यावरण रक्षणासाठीच आहे.खाजगी वाहतूक कमी करुन सार्वजनिक वाहतूक वाढल्यानंतरच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणारचे रक्षणच होणार आहे. आरेमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचा निर्णय भावनाप्रधान घेण्याऐवजी व्यवहार्यतेवर घेतला पाहिजे. शेलार यांनी टोला लगावला की उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत हे सरकार काम करत आहे. याच कारणाने सव्वा चार ते साडेचार कोटी रुपयांचा तोटा होईल. प्रकल्प विलंबित राहिल्याने प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे त्याचा भुर्दंड मुंबईकरांना वाढीव तिकीटाद्वारे सोसावा लागेल असे देखील मत शेलारांनी व्यक्त केले.

गुंतवणूकीबद्दल बोलताना शेलार म्हणाले की मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती देण्याचा परिणाम परदेशी गुंतवणूकीवर होणार आहे. अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना, देशांना या माध्यमातून वेगळा संदेश जात आहे. आता तिथली झाडं तोडण्यात आली आहे. आता मोकळ्या जागेत कारशेड उभारणे सार्वजनिक हिताचे राहिलं असेही शेलार म्हणाले.

Visit : policenama.com