‘टॉपलेस’ योगामुळं चर्चेत आलेल्या आशका गोराडियाच्या बिकिनी लुकचा ‘कहर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉस 6 ची एक्स कंटेस्टेंट, ॲक्ट्रेस आशका गोराडिया (Aashka Goradia) सोशलवर कायमच ॲक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळं ती कायमच चर्चेत येत असते. तिनं अनेकदा बिकिनी घालून योगा केला आहे. तिनं एकदा टॉपलेस योगाही केला होता ज्यामुळं तिची खूप चर्चा झाली होती. आशका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच आशकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

आशकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. सध्या या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. यात आशका खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना भुरळ घालणारे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

लुकबद्दल बोलायचं झालं तर आशकानं ब्लॅक बिकिनी घातली आहे. समुद्रकिनारी पोज देणारी आशका खूपच हॉट दिसत आहे. तिची पोजही लक्ष वेधून घेत आहे.

आशकाचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

आशकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर बॉयफ्रेंड ब्रेंट गोबल सोबत लग्न केल्यानंतर आशकानं जग फिरण्यात व्यस्त झाली होती आशका आणि ब्रेंट डिसेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर हे कपल जगाच्या सफरीवर निघालं होतं. ब्रेंट सर्टीफाईड योगा ट्रेनर आहे. आशकाही त्याच्या सोबत योगा करताना दिसत असते.

आशकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2002 मध्ये आलेल्या अचानक 37 साल बाद या मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं कुसुम, गेट सेट गो, सिंदूर तेरे नाम का, विरुद्ध आणि नागिन, साँस भी कभी बहू थी अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6, खतरों के खिलाडी, नच बलिए अशा अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे.