‘आश्रम’ फेम अनुप्रिया गोयनकाचा गौप्यस्फोट; ’18 व्या वर्षीच एका धार्मिक बाबानं केला होता गैरफायदा घेण्याचा प्रयत्न’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनुप्रिया गोयनका (Anupriya Goenka) हिनं अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अलीकडेच ती बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) वेब सीरिजमध्ये झळकली आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनंही अशाच एका बाबाचा आलेला अनुभव सांगितला आहे. तिनं सांगितलं की एका बाबानं 18 व्या वर्षी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता.

अनुप्रिया आपला अनुभव सांगताना म्हणाली की, माझ्या वडिलांना अध्यात्मात खूप रुची होती. ते बाबाच्या नादात असायचे. यामुळं त्यांच्या कुटुंबाचीही वाटणी झाली. वडिलांमुळं मीही बाबा लोकांवर विश्वास करू लागले होते. एका बाबानं माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी असं होऊ दिलं नाही. काही भेटीत मला असं जाणवू लागलं की, काहीतरी चुकीचं होत आहे. मला काही समजत नव्हतं. मी त्यांच्यावर भरोसा करत होते. नशीब की, मी गैरफायदा घेऊ दिला नाही आणि तिथून पळ काढला.

https://www.instagram.com/p/CDdY564h0v8/?utm_source=ig_embed

आश्रम वेब सीरिजबद्दल बोलताना अनुप्रिया म्हणते, ही सीरिज कोणत्याही धर्माच्या भावना दुखावत नाही. परंतु लोकांना जागरूक करण्यासाठी हे बनवण्यात आलं आहे.

आश्रमच्या सीरिजच्या पहिल्या सीझनला 400 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. खुद्द प्रकाश झा यांनीची याबाबत माहिती दिली होती. पहिला सीजन हा 28 ऑगस्ट रोजी एम एक्स प्लेअरवर रिलीज झाला होता. बुधवारी (दि 11 नोव्हेंबर) याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.