EVM विरोधात घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार, राज ठाकरेंचं पुढचं पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात राजकीय वातावरण तयार झाले आहे. त्यात भाजप आणि शिवसेनेन लोकांपर्यंत यात्रा सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे. तसंच निवडणुकांत ईव्हीएम मशीनच्या वापरावर सर्व विरोधक एकवटले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली. तसंच विरोधकांवरही टीका केली.

लोकसभा निवडणुकीत ३७१ मतदारसंघात मतदानात घोळ झाला आहे. ५४ लाख मत वाढीव आहेत. त्यामुळे राज्यांराज्यात ईव्हीएम विरोधात उठाव होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच विरोधकांवर टीकाही त्यांनी केली. भाजपमधील सत्ताधारी नेते एवढ्या जागा येतील. असा अंदाज सांगतात आणि तेवढ्याच जागा निवडून येतात. लोकशाहीत असं घडता कामा नये, लोकशाहीत जनतेनं बहुमतानं एखाद्या नेत्याला नक्कीच निवडून द्यावं, पण एकंदरीतच ईव्हीएमबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जर २०० च्या पुढे जागा जिंकण्याचा विश्वास असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला. तसंच देशातल्या विरोधकांसह काही एनजीओंमध्येही संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं आहे, असंही त्यांनी सांगितले. तसच मी निवडणूक आयोगाला विचारलं ईव्हीएमची चिप कुठे बनते, ते म्हणाले अमेरिकेत. ज्या अमेरिकेत गोंधळ सुरू आहे, त्या अमेरिकेत चिप बनते त्यावर आमच्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित आहे.

तसंच ईव्हीएम विरोधातील आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह दिसणार नाही. तसंच आम्ही महाराष्ट्रात लोकांच्या घरोघरी जाऊन बॅलेट पेपरनं निवडणूक व्हाव्यात, यासाठी फॉर्म भरून घेणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव, फोटो आणि सही असलेले ते फॉर्म जनतेकडून भरून घेतले जातील, असं त्यांनी सांगितलं. विरोधकांचा २१ ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा निघणार असून, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे जनतेनं भरलेले फॉर्म देण्यात येतील. हा या आंदोलनाचा पहिला टप्पा असेल. तसेच निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हाव्यात. यासाठी जनतेला आवाहन करत आहोत. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त