Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात; डॉक्टरसह चौघांवर FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबादमधील एक संतापजनक घटना (Aurangabad Crime) उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय डॉक्टरने जवळीक वाढवून नर्ससोबत जबरदस्तीने अनेकदा शरीर संबंध (Rape in Aurangabad) ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे युवती गरोदर (Pregnant) राहिली असता गोळ्या देऊन तिचा गर्भपात (Abortion) करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याचबरोबर संबधित डॉक्टरच्या मावस भावाने देखील तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे, डॉक्टरच्या अन्य दोघा मित्रांनी विनयभंग (Molestation case ) केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्त निखील गुप्ता (CP Nikhil Gupta), उपायुक्त अपर्णा गीते (DCP Aparna Geete) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) धुमे (ACP Dhume) यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक सोमवारी (10 जानेवारी) रोजी पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी सिडको बसस्थानकच्या सुरक्षारक्षकाचा कॉल आला. बस स्थानकात अंदाजे 25 वर्षीय तरुणी तिथे आलेली असून तिला दामिनी पथकाच्या (Damini Squad) मदतीची गरज आहे. असं त्याने सांगितले. यानंतर पोलीस अधिकारी सिडको बस स्थानक परिसरात जाऊन पीडितेला भेटले, तेव्हा ती अतिशय अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. (Aurangabad Crime)

गारखेडा परिसरातील (Garkheda Aurangabad) एका नामांकित रुग्णालयात ती नर्स म्हणून गेल्या 3 महिन्यांपासून कार्यरत आहे. याच रुग्णालयात RMO म्हणून कार्यरत असलेल्या एका 25 वर्षीय डॉक्टरने तिच्यासोबत जवळीक साधून जबरदस्तीने अनेकदा शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवले. तरुणी गरोदर राहिली असता गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मुलीला रक्तस्त्राव होऊन तीव्र वेदना होत असल्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता, त्याने परत तिला मुकुंदवाडी पोलीस हद्दीत (Mukundwadi Police Station) जालना रोडवर (Jalna Road) असलेल्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्याशी शारीरिक संबंध जबरदस्तीने ठेवले आणि पलायन झाला.

यानंतर त्याच्या मावस भावानेही तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र, ती तरूणी त्याच्या तावडीतून बचावली.
डॉक्टरच्या अन्य दोघां मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तरुणीने सांगितले आहे.
दरम्यान, हे प्रकरण मुकुंदवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुलीला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
यानंतर डॉक्टर आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : Aaurangabad Crime | aurangabad 25 years old doctor assaults nurse forces for abortion FIR on 4 in mukundwadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…