PM मोदींच्या ‘आयुष्मान’ भारतचा बोजवारा ; अनेक हॉस्पिटलची चौकशी, 2 डॉक्टर निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठा गाजावाजा करत मोदी सरकारने गरिबांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान योजनेचे लॉन्चिंग केले होते. परंतू या महत्वकांशी योजनेला हरताळ फासला गेला आहे. या योजनेच्या दुरोपयोग करुन अनेक हॉस्पिटलमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

या योजनेअंतर्गत घोटाळा केल्यामुळे आता पर्यत तब्बल 12 हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे, ज्यांनी या योजनेचा वापर करुन घोटाळा केला आहे. यात 52 लाख रुपयांचा भरणा सरकारने केला असून आणखी 52 लाखांचा भरणा करने बाकी आहे. तपासणी करण्यात येणाऱ्या यादीत 12 हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता मात्र आता 2 हॉस्पिटल यादीतून बाहेर करण्यात आले आहे, तर 10 हॉस्पिटलची तपासणी करण्यात येत आहे. या घोटाळ्यात आढळलेल्या 2 डॉक्टरांना निलंबित केले आहे. हा प्रकार देहराडूनमध्ये घडला आहे.

गरीबांना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार मिळण्यासाठी मोदी सरकार अटल आयुष्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतू काही हॉस्पिटलने लोकांचा हक्कांवर डाका टाकला असून सरकारला देखील चूना लावला आहे.

अटल आयुष्मान योजनाचे अप्पर निर्देशकांनी सांगितले की दोन हॉस्पिटलवर कारवाई केल्यानंतर त्यांना लगेचच यादीतून वगळण्यात आले आहे. तर घोटाळ्यामुळे 10 इतर हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आहे. हॉस्पिटलचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर करवाई करण्यात येईल.

योजनेअंतर्गत उपचार केल्याने सरकारने केला हॉस्पिटलला 52 लाखांचा भरणा –
कोणीही उपचारापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती. घोटाळा करण्यात आलेल्या हॉस्पिटलकडून अजून कोणताही दंड आकरण्यात आला नाही, परंतू या योजना अंतर्गत करण्यात आलेल्या उपचारामुळे सरकारने या हॉस्पिटलला 52 लाखांचा भरणा देखील केला आहे. तर 52 लाखाचा भरणा करणे बाकी आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय