फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. याबाबत देशभरात संतापाची लाट आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हल्ल्यावरून देशात राजकारण करू नेये असं आवाहन देऊनही या हल्ल्याचे राजकारण केले जाते. आझम खान यांनी मोठे वादग्रस्त वक्तव्य केले. देशातील सुरक्षा यंत्रणांना राजकीय कामांची जबाबदारी सोपवण्यात आल्यावर पुलवामासारखा हल्ला अपेक्षितच होता, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत मग त्यामध्ये गुप्तचर यंत्रणाही असतील त्यांच्यावर राजकीय कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहीजण ममता बॅनर्जींचा तपास करत आहेत तर काहीजण रॉबर्ट वड्रा आणि अखिलेश यादव यांचा तपास करण्यात व्यस्त आहेत’, असं आझम खान यांनी म्हटलं.

जेव्हा तपास यंत्रणांकडून त्यांचं मूळ काम काढून घेतलं जातं, आणि राजकीय काम सोपवलं जातं. तेव्हा वाईट गोष्टी होणारच, अशी प्रतिक्रिया खान यांनी दिली.

दरम्यान, तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या गाडीने पुलवामामध्ये जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले, तर अधिक जखमी झाले आहेत. या घटनेचे राजकारण करू नये, असं सांगूनही आझम खान यांनी यावर वादग्रस्त वक्तव्य करून नवीन वादाला सुरुवात केली आहे.

Loading...
You might also like