एबी डिव्हिलियर्सचा क्रिकेटला गुडबाय.!

मुंबई: वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने धक्कादायकरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. डिव्हिलियर्सने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे क्रिकेट वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.

डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय का घेत आहोत, हे एका व्हिडीओद्वारे ट्विटरवर जाहीर केलं. “मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे” असं डिव्हिलियर्स म्हणाला.