अब की बार उद्धव सरकार : मुख्यमंत्री ‘सेने’चाच होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना-भाजप युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. आज शिवसेना आणि भाजपच्या युतीचे अधिकृतपणे जाहीर केलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ही शक्यता खरी ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीनंतर चर्चा करुन ते युतीबाबत पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे, त्यावर चर्चा झाली आहे. आता दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते संध्याकाळी त्याबाबत माहिती देतील. नक्कीच युतीच्या दिशेने पाऊल पडलं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी म्हटलं. त्यावर ‘अब की बार उद्धव सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार’ असा नाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून त्यांच्या अटी आणि शर्थी सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असं चित्र जनतेला पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यात जनता कोणाचे पारडं जड करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.