Aba Bagul | मिळकत कराच्या अभय योजनेला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस नेते आबा बागूल यांचा सत्ताधारी आणि प्रशासनावर हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वारंवार मिळकत कराची (property tax) अभय योजना (Abhay Yojana) आणण्याचा घाट घातला जात असून प्रशासन यास मूक पाठींबा देत आहे. परिणामी पुणे महानगरपालिकेचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे, असा घणाघात काँग्रेसचे नेते (Congress leader) आबा बागुल (Aba Bagul) यांनी केला आहे. आबा बागुल (Aba Bagul) म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्नस्त्रोत असल्याने हा कर वेळेत भरावा व वेळेत कर न भरल्यास प्रति महिना 2 टकके दंड घेणेबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये (Maharashtra Municipal Corporation Act) तरतूद केलेली आहे. हा कायदा राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू आहे. यामध्ये एखाद्या मिळकतीबाबत निर्णय घेण्याची असलेल्या तरतुदीचा चुकीचा अर्थ काढत वारंवार अभय योजना आणणे, म्हणजे करबुडव्यांना सवलत व प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होत अल्याचे बागूल यांनी म्हटले.

 

लोकप्रतिनिधींनी कितीही आग्रह केला तरी आपणा महापालिकेच्या हिताचा निर्णय घेऊन कायद्यात तरतूद नसलेली अभय योजना आणू नये. पूर्वी सर्वसामान्यांसाठी मिळकत कराची अभय योजना आणली होती, हि बाब आपण समजू शकतो, परंतु करोडोची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नसल्याचे आबा बागूल (Aba Bagul) यांनी म्हटले आहे.

मिळकत कर वेळेत वसुल करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून वेळेत कर वसूल न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या C.R. मध्ये नोंद करणेबाबत तरतूद आहे.
मिळकत कर वेळेत वसूल न झाल्याने उत्पन्न कमी झाल्याने पुणेकरांना अनेक विकासकामे (Development work) व प्रकल्पांपासून वंचित रहावे लागले आहे.
एच.सी.एम.टी.आर. सारखा शहरातील वाहतूक समस्या सोडविणारा प्रकल्प व अशी अनेक उदाहरणे आहेत.

 

मिळकत कर अभय योजना आणण्याची हालचाल चालू झाल्याने माहिती घेतली असता 2175 कोटींची थकबाकी असून
1 ते 2 कोटी थकबाकी पर्यंत असलेल्या मिळकतींना सवलत देणेबाबत विचार विनिमय चालू असून हे महापालिकेच्या हिताचे नाही.
1 ते 2 कोटी थकबाकी असलेल्या मिळकतींना मिळकत कराची अभय योजना आणण्यास काँग्रस पक्षाचा विरोध असून
आपण यावर लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडू नये, असे बागूल यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Aba Bagul | Congress opposes property tax protection scheme, Congress leader Aba Bagul attacks the ruling party and the administration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Online Instant Loan घेण्यात महत्वाची आहे आधार कार्डची भूमिका, सहज होते e-KYC ची प्रक्रिया पूर्ण

Jacqueline Fernandez | महाठग चंद्रशेखरचे धक्कादायक खुलासे ! जॅकलीनला 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांची मांजर दिली भेट, तर नोराला…

Ashok Godse | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष थोर गणेश भक्त अशोक गोडसे यांचं निधन