Aba Bagul | पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे संगीत-सांस्कृतिक जगताची मोठी हानी : आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संतूर वाद्याला जगमान्यता मिळवून देणारे भारतीय संगीतकार (Indian Musicians) प्रख्यात संतूर वादक (Santoor Player) पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनामुळे (Pandit Shivkumar Sharma Passes Away) संगीत-सांस्कृतिक जगताची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) काँग्रेसचे (Congress) माजी गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी श्रद्धांजली (Tribute) वाहिली. तसेच आबा बागूल (Aba Bagul) यांनी  2015 मध्ये पुण्याला दिलेल्या विशेष भेटीच्या आठवणींना उजाळाही दिला.

 

संतूर हे वाद्य जगप्रसिद्ध करण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे योगदान मोठे होते. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया (Pandit Hariprasad Chaurasia) यांच्यासमवेत पुण्याला भेट (Pune Visit) दिली होती. शिवदर्शन येथील कै.वसंतराव बागूल उद्यानातील (Late Vasantrao Bagul Udyan) भारतरत्न भीमसेन जोशी कलादालनात (Bharat Ratna Bhimsen Joshi Art Gallery) पुणे मनपाच्यावतीने तत्कालीन उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul)  यांच्या संकल्पनेतून मॅड मॅपिंग या अनोख्या प्रकल्पात पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा  आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे उत्तम वेशभूषेतील सुमारे साडेतीन फूट उंचीचे फायबरचे बैठे पुतळे बसविण्यात आले.

 

त्यावेळी पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी स्वतः उद्घाटनाआधी भेट देऊन या प्रकल्पाचे आणि संकल्पनेचे कौतुक केले होते. हे पुतळे स्वतः प्रत्यक्ष बोलत असल्याचा भास होतो, काही क्षण कळलंही नाही, इतके हुबेहूब पुतळे आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद कायम स्मरणात आहे ,अशी भावना आबा बागुल यांनी व्यक्त केली.

Web Title :- Aba Bagul | The great loss to the world of music and culture due to
the demise of Pandit Shivkumar Sharma: Aba Bagul


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nikki Tamboli Glamorous Photo | हॉट आणि ग्लॅमरस… निक्की तांबोळीनं मादक फोटो शेअर करून नेटकऱ्यांना लावलं वेड..

PMC Water Supply | कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला ! पाणी बचतीसाठी पिण्याचे पाणी वापरणारी वॉशिंग सेंटर्स, बांधकामे बंद करणार

Pune Crime | शेअर मार्केट मधील गुंतवणूकीवर जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून 60 लाखांची फसवणूक, 5 जणांविरुद्ध FIR

Tara Sutaria Hot Photos | ‘हाय गर्मी…’ कडक उन्हात आणखी हॉट झाली तारा सुतारिया..

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..