Aba Bagul | समाविष्ट 23 गावांसाठी पाणीपुरवठ्याची जबाबदारी विकसकाची नव्हे, तर पुणे महानगरपालिकेचीच – आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aba Bagul | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट 23 गावांमधील नव्या सोसायटी/ सदनिका धारकांना बांधकाम व्यावसायिक (Builders) हेच सध्या पाणीपुरवठा (Water Supply) करतील असे प्रतिज्ञापत्र (Affidavit) पुणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयात (High Court) सादर केले आहे. मात्र ते पूर्णतः चुकीचे आहे. वास्तविक पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी लिहुन दिले, या नावाखाली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही, एकप्रकारे पुणे महानगरपालिका पाणी प्रश्नात 23 गावांमधील नागरिकांची शुद्ध फसवणूक करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी गट नेते आबा बागुल यांनी केला आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा देणे ही जबाबदारी एमआरटीपी ऍक्टनुसार (MRTP Act) पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए (PMRDA) यांचीच आहे. बांधकाम व्यावसायिक /विकसक हे बिल्डिंग बांधतात आणि निघून जातात. मात्र जे प्रत्यक्ष राहावयास असतात,त्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आणि पैसे मोजून पाणी घ्यावे लागते आणि ते मिळतही नाही. यात नागरिकच भरडले जातात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी लिहून दिले, हे कारण पुढे रेटून जबाबदारी झटकता येणार नसल्याचे आबा बागुल (Aba Bagul) यांनी म्हटले आहे.

 

प्रशासनाने बांधकाम परवानगी (Construction Permit), प्लॅन प्रक्रियेत आम्ही अटी टाकल्या असे म्हणणे गैर आहे. वास्तविक बांधकाम परवानगी, प्लॅन मंजूर करताना अटी फक्त बांधकामाच्या टाकता येतात. मोजणी असो ,बांधकाम यापुरते ते सीमित आहे. याबाबत न्यायालयानेही पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा महापालिकेने द्याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे पीएमआरडीए अथवा महापालिकेने बांधकाम प्लॅन मंजूर केले तरी ज्या हद्दीत बांधकामे आहे, त्यांना पाणी देणे हे त्या प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जबाबदारी झटकण्यासाठी पुणे महानगरपालिकेने चुकीची माहिती प्रसिद्ध करून नागरिकांना वेठीस धरू नये, असेही आबा बागूल यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या हितालाच प्राधान्य दिले पाहिजे.जर महापालिका पाणी पुरवठा करू शकत नाही, मग बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा काय देते? हा प्रश्नही दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यामुळे समाविष्ट 23 गावामंधील नागरिकांना महापालिकेनेच पाणीपुरवठा करावा, मग तो समान पाणीपुरवठा योजनेतून किंवा अन्य स्रोतातून कसा करायचा याची जबाबदारी महापालिकेचीच आहे
आणि महापालिकेकडूनच समाविष्ट 23 गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे ही काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे.

 

कर नाही भरला तर…
जरी समाविष्ट 23 गावांमधील बांधकाम शुल्क पीएमआरडीने घेतले असले तरी आपण राज्यशासनाकडे मागणी केलेली आहे.
त्यामुळे पालिका हद्दीत जी जी गावे समाविष्ट आहेत, त्यांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा.
नाहीतर या गावांमधील नागरिकांनी जर कोणतेही शुल्क अथवा कर भरला नाही तर त्यांना दोषी धरू नये,
असा इशारा आबा बागुल यांनी महापापालिका प्रशासनाला दिला आहे.

 

Web Title :- Aba Bagul | The responsibility for water supply for the 23 villages included lies not with the developer, but with the Pune Municipal Corporation – Aba Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 64 जणांवर कारवाई

 

Pune Crime | संतापजनक! 11 वर्षाच्या लेकराला आई-वडिलांनीच 22 श्वानांसोबत घरात ठेवलं डांबून; बाहेर येताच श्वानांप्रमाणं वागू लागला मुलगा, पुण्यातील घटना

 

Herbs For Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले बॅड कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती