Aba Bagul | 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणारे 385 मिळकत धारक कोण? यांचे भाजपशी काय हितसंबंध, काँग्रेस पक्षनेते आबा बागूल यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत, महापालिकेला कोट्यावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणाऱ्या अभय योजनेला (Abhay Yojana) काँग्रेसने विरोध केला आहे. तसेच 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणारे 385 मिळकत धारक कोण? यांचे भाजपशी (BJP) काय हितसंबंध आहेत असा सवाल काँग्रेसचे नेते (Congress leader) आबा बागूल (Aba Bagul) यांनी केला आहे. तसेच याचे उत्तर पुणेकरांना द्यावे लागेल असेही आबा बागूल (Aba Bagul) यांनी म्हटले आहे.

 

आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये (Standing Committee Meeting) बहुमताच्या जोरावर 1 कोटीपर्यंत थकबाकी असणाऱ्या मिळकतींचा दंड माफ करण्यासाठी भाजपने मिळकत कराची (Income tax) अभय योजनेचा प्रस्ताव मांडला, यावेळी काँग्रेस पक्षाने मागील पाच आर्थिक वर्षात (financial year) प्रतिवर्षी वेळेत कर भरणाऱ्या निवासी मिळकतधारकांना (residential property owners) सन 2022-23 चा संपूर्ण मिळकत कर माफ करण्यात यावा अशी उपसूचना दिली असता ती देखील सुसंगत नाही असे कारण दाखवत फेटाळण्यात आली.

 

50 लाख वरील 1 कोटी पर्यंत थकबाकी असणाऱ्या 385 मिळकती असून यांची निव्वळ थकबाकी 56.35 कोटी असून 2 टक्के दंडाची रक्कम 215.06 कोटी असून एकूण थकबाकी 271.42 कोटी इतकी आहे. तसेच 50 लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या 4,23,437 असून त्यांची निव्वळ थकबाकी 1372.98 कोटी असून 2 टक्के दंडाची रक्कम 2150.59 कोटी असून एकूण थकबाकी असून 3523.57 कोटी इतकी आहे. हे आकडे पाहता सत्ताधारी भाजप प्रामाणिकपणे प्रतिवर्षी मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांवर अन्याय करणारी, महापालिकेला कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणारी अशी ही योजना असल्याचा आरोप आबा बागूल (Aba Bagul) यांनी केला आहे.

पुणे मनपा प्रशासन वेळेवर कर वसूल करण्यास असमर्थ ठरत असून सत्ताधारी पक्षाकडून 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणाऱ्या 385 मिळकत धारकांना सवलत देण्यासाठी हा उदयोग सुरू असून हे 385 मिळकत धारक कोण? यांचे सत्ताधारी पक्षाबरोबर काय लागेबांधे आहेत याचे उत्तर पुणेकरांना दयावे लागणार असल्याचे बागूल यांनी म्हटले.

 

पुणे मनपाचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्न असून हा कर वेळेत भरून महापालिकेडून मूलभूत सेवा व सुविधांची कामे वेळेवर व्हावीत
या हेतूने हा कर वेळेत भरला जावा म्हणून कायदयामध्ये 2 टक्के शास्तीची तरतूद करण्यात आली
असून ही शास्ती माफ करण्याचा अधिकार कायद्याने कोणासही नाही.
पूर्वी गोरगरीबांसाठी अभय योजना आणली ही बाब आम्ही समजू शकतो.
परंतू कोटयावधींची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही.
या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत,
महापालिकेस कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणाऱ्या अभय योजनेस विरोध केला
असून महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नका अशी मागणी आबा बागूलांनी केली आहे.

 

Web Title :- Aba Bagul | Who owns 385 properties with arrears of Rs 50 lakh to Rs 1 crore? What is interest of BJP, Congress party leader Aba Bagul’s question

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेची मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना ! शास्तीच्या रकमेत मिळणार 75 % सवलत पण…

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 40 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोनोरी ड्रेसमध्ये दाखवली कातिलाना फिगर, फोटोंनी लावली आग