कोणाचीही हत्या न करता मोठा झाला डॉन ; सुटकेसाठी इंदिरा गांधींना ऑफर केली होती एवढी मोठी रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उभरून आले. पण एका नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवी ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले. ते नाव म्हणजे हाजी अली मस्तान. मस्तानला मुंबईचा पहिला डॉन म्हटले जाते.
कोण होता हाजी मस्तान?
तमिळनाडूच्या कुड्डलोर येथे 26 मार्ज 1926 रोजी हाजी मस्तान मिर्झाचा जन्म झाला होता. त्याचे वडील हैदर मिर्झा एक गरीब शेतकरी होते. त्यांची आर्थिक परिस्थितीत खूपच बिकट होती. अनेकवेळा घरामध्ये खाण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. घर चालवणे फार जिकरीचे झाले होते. अशा हलाकिच्या परिस्थीतीमुळे हैदर मिर्झाची शहरात जाण्याची इच्छा होती. पण परिस्थीतीमुळे घर सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती.
मस्तान परिवार 1934 मध्ये मुंबईत दाखल
घरच्या परिस्थिती इतकी हलाकीची झाली की दोन दिवस घरामध्ये अन्नाचा कण शिजला नव्हता. अखेर या परिस्थीतीला वैतागून हैदर मिर्झाने बाहेर जाऊन पैसे कमविण्याचा निश्चय केला आणि 1934 मध्ये त्याने आपल्या मुलाला सोबत घेऊन मुंबई गाठली. येथे त्यांनी अनेक कामे केली पण त्यात यश मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. बराच काळ लोटूनही दुकानातून विशेष काही कमाई होत नव्हती. दरम्यान दुकानावर रिकामा बसलेला मस्तान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि आलिशान इमारतींकडे पाहत असे. येथून त्याला आपल्याकडे पण गाड्या आणि बंगले असावे असे स्वप्न रंगवले होते.
कुलीच्या कामापासून केली सुरुवात
मिर्झा परिवाराला मुंबईत येऊन 10 वर्ष झाले होते. पण परिस्थीती मात्र बदल झाला नव्हता. याच दरम्यान मुंबईच्या गालिब शेख सोबत मस्तानची ओळख झाली. गालिबला देखील एका चतुर मुलाची आवश्यकता होती. त्याने मस्तानला सांगितले की, तो जर डॉकवर कुलीचे काम केले तर तो त्याच्या कपडे आणि पिशवीमध्ये काही विशेष सामान लपवून आरामात बाहेर आणू शकतो. या मोबदल्यात त्याला पैसे देखील मिळतील. यानंतर मस्तानने 1944 मध्ये डॉकवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो तेथे मनलावून काम करत होता. कामादरम्यान मस्तानने डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली.
गुन्हेगारी विश्वातील पहिले पाऊल
चाळीसच्या दशकात लोक विदेशातून इलेक्ट्रॉनिक सामान, महागडी घड्याळे, सोने, चांदी किंवा दागिने घेऊन येत होते. त्यांना या सामानावर कराच्या रूपात मोठी रक्कम द्यावी लागत होती. यामुळे डॉकवर तस्करी करणे फायद्याचे होते. गालिबची ही गोष्ट मस्तीनच्या लक्षात आली होती. मस्तानने आपल्या हातून ही संधी सोडली नाही आणि त्याने गुपचुपपणे तस्करांची मदत करण्यास सुरुवात केली. कुली असल्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. या कामासाठी मस्तानला चांगली किंमत मिळत होती.
कुली झाला तस्कर
डॉकवर काम करताना मस्तानचे आयुष्य सुधारण्यास सुरुवात झाली होती. तस्करांची मदत केल्यामुळे त्याला चांगलाच फायदा होत होता. 1950 दशक मस्तान मिर्झासाठी एक मोलाचा दगड ठरले होते. 1956 मध्ये दमन आणि गुजरातचा कुख्यात तस्कर सुकुर नारायण बखिया आणि मस्तानच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळी सोन्याची बिस्कीटे, फिलिप्सचे ट्रांझिस्टर आणि ब्रँडेड घड्याळींची खूप मागणी होती. पण टॅक्समुळे अशाप्रकारचे सामान भारतात आणणे परवडण्यासारखे नव्हते. त्यानंतर दोघांनी दुबई आणि येडन येथून सामानाची तस्करी करू लागले. या तस्करीमधून दोघांनाही चांगला नफा मिळत होता. हळूहळू दोघांचे काम वाढत गेले आणि आता मस्तानचे आयुष्य पहिल्यापेक्षा फार बदलले होते. एक साधारण कुलीचे काम करणारा मस्तान आता बाहुबली माफिया मस्तान भाई बनला होता.
गुन्हेगारी विश्वातील मोठे नाव
सुरुवातीला मुंबई अंडरवर्ल्डमध्ये वरदराजन मुदलियार ऊर्फ वर्धा याची दहशत होती. पण त्याला माफिया डॉनची प्रतिमा निर्माण करता आली नाही. काही काळानंतर तो चेन्नईला माघारी फिरला. तो गेल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये फक्त मस्तान भाई म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होते. 1970 चे दशक येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती. मस्तानने फक्त दहा वर्षात मुंबईमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले होते. मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानचेच शासन चालत होते. मस्तानचे जे स्वप्न पाहिले होते, त्यापेक्षा कितीतरी मोठी झेप त्याने घेतली होती. तो आता श्रीमंत आणि सामर्थ्यवान बनला होता. त्याला पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करण्याचा आणि मर्सिडीज गाडीतून फिरण्याचा खूप धंद होता.
बॉलीवूडचे होते वेड
मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनला बॉलीवूडचे खूपच आकर्षण होते. हाजी मस्तान बॉलीवूड अभिनेत्री मधुबालाचा प्रचंड चाहता असल्याचे मुंबईतील जुने लोक सांगतात. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. पण परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर त्याने मधुबाला सारख्या दिसणाऱ्या सोना या फिल्म अभिनेत्रीसोबत विवाह केला. मस्तानने सोनाच्या अनेक चित्रपटांना फायनान्स केले होते. पण तिचे चित्रपट फ्लॉप गेले. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान आणि संजीव कुमार सारखे दिग्गज बॉलीवूड अभिनेते हाजी मस्तानचे मित्र होते असे सांगितले जाते. अनेक बॉलीवूडमधील अनेक दिग्गज त्याच्या बंगल्यावर दिसत होते.
पोलिसही झुकायचे डॉन समोर 
हाजी मस्तानने मुंबईमध्ये आपले वर्चस्व असे प्रस्थापित केले की, पोलिस आणि कायद्याला तो झुगारत नव्हता. पोलिसांनी त्याला 1974 मध्ये अटक केली असता, त्याच्यासाठी व्हीआयपी सारखी सुविधा दिली होती. त्याला तुरूंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आले होते. पोलिस त्याला सलाम करत होते. कारण मस्तान देखील पोलिसांची मदत करत होता. त्यांना महागड्या भेटवस्तू देणे त्याची सवय होती. पण जर एखादा अधिकारी त्याचे म्हणणे ऐकत नसेल तर तो त्याची बदली करत होता.
इंदिरा गांधींनी पाठविले तुरूंगात
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मस्तानविषयी माहिती मिळत होती. मस्तानच्या वाढत्या प्रभावाचा इंदिरा गांधींना त्रास होत होता. इंदिरा गांधीच्या आदेशावरून पोलिसांनी मस्तान मिर्झाला अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. पण आणीबाणीच्या लागू केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तुरूंगात जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. 18 महिने तो तुरूंगात राहिला होता. येथून त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार होती. तेथे त्याची आणि जेपी यांची भेट झाली. जेपीच्या संपर्कात आल्यानंतर मस्तानवर त्याचा विशेष प्रभाव पडला. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानचे हेतू बदलले होते. त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकण्याचा निश्चय केला.

इंदिरा गांधींना ऑफर केली मोठी रक्कम

 

आणीबाणीत तुरूंगात गेल्यानंतर काही दिवसातच हाजी मस्तानने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या सुटकेसाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर केली होती. पण इंदिराजींनी ही ऑफर लाथाडून लावली. आणीबाणीनंतर जनता पार्टी सत्ता आल्यानंतर मस्तानसह जवळपास 40 कुख्यात तस्करांना सोडून देण्यात आले. कारण मस्तानने आणीबाणी लागू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली होती. यामुळे जनता पार्टी सरकारने मस्तानची मदत केली होती.
राजकारणात ठेवले पाऊल
अखेर मस्तानने 1980 मध्ये गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला आणि राजकारणाकडे आपले मन वळविले. 1984 मध्ये महाराष्ट्राचे दलित नेते जोगिन्दर कावडे यांच्यासोबत मिळून दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली. 1990 मध्ये पार्टीचे भारतीय अल्पसंख्यक महासंघ असे नामकरण करण्यात आले. बॉलीवूड सुपरस्टाप दिलीप कुमार यांनी या राजकीय पक्षाचा भरपूर प्रचार केला. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दर्शविली होती. पक्षाला राजकारणात यश मिळाले नसले तरी निवडणुकीमध्ये काळ्यापैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे सांगितले जाते. येथूनच निवडणुकीमध्ये मोठ्याप्रमाणीत पैसा वापरण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.
कुणाचा जीव ही नाही घेतला, गोळी पण नाही चालवली  
हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत मोठा ताकदवर डॉन होता. पण या डॉनने आपल्या संपुर्ण आयुष्यात कोणाचाही जीव घेतला नाही. त्याने कोणावरही हल्ला केला नाही. एकवढेच नाही तर त्याने एक सु्द्धा चालविली नाही. असे असूनही मस्तान या गुन्हेगारी विश्वातील मोठे नाव होते. त्याकाळी त्याचा नाव फक्त मुंबईतच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात होते. मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉनने आयुष्यभर मुंबईच्या लोकांची मदत करत होता. आपल्या जीवनाचा शेवटचा काळ त्याने आपली पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत व्यतित केला. हाजी मस्तानचा 1994 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबईत आजही त्याच्या नावाचे किस्से ऐकायला मिळतात.