आबाच्या कन्या स्मिता यांचा ‘लग्न सोहळा’थाटामाटात संपन्न!

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यातील लक्ष्मी लाॅन्स येथे नुकताच पार पडला.

या विवाह सोहळ्या वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले. तर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे ) भावंडाचे अगत्य पाहून सर्व जण भारावून गेले होते.

आर आर आबा ची कन्या स्मिता पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आंनद यांचा विवाह सोहळयांच्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे सकाळपासून हजर होते. त्यांनी या सोहळ्यात घरातील व्यक्ती प्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अजित पवार हे प्रवेशद्वारावर उपस्थित राहून प्रत्येक नागरिकांचे स्वागत करीत होते. त्याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील कार्यालयात प्रवेश केला आणि थेट स्मिता यांच्या आई सुमन यांच्याकडे गेल्या. सुप्रिया यांना पाहून सुमन पाटील यांना गहिवरून आले. सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट, प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजीत कदम, निलम गोऱ्हे यांसह असंख्य जणांना अक्षता वाटल्या. हे पाहून उपस्थित भारावून गेले.

त्यानंतर स्मिता पाटील आणि आंनद थोरात यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास पालकमंत्री गिरीश बापट, प्रफुल पटेल, मंत्री राम शिंदे, सुभाष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजीत कदम, निलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे, सरकारी वकील उज्वल निकम तसेच यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

संबंधीत घडामोडी-

‘मेहंदी तेरे नाम की;आबांची कन्या स्मिताने रंगवली ‘आनंद’ च्या नावाची मेहंदी

दिवंगत आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता हिच्या लग्नसमारंभाचे काही खास क्षण….

आबाच्या कन्येच्या लग्नाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत