दिलासादायक ! 18 एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकते 5 मिनिटामध्ये ‘कोरोना’ची टेस्ट करणारी ‘किट’

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचे संकट असताना एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी अमेरिकन कंपनी एबॉटकडून बनवले गेलेले रॅपिड किट (केवळ ५ मिनिटात तपासणी) आता भारतात येणार आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, हे किट १८ एप्रिलपर्यंत भारतात येऊ शकते. एबॉटची ही तपासणी किट पाच मिनिटात व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह आहे का नाही ते सांगते आणि निगेटिव्ह रिपोर्ट १३ मिनिटात सांगते.

या किटचे वैशिष्ट्य हे आहे की, हे किट इतके हलके आणि छोटे आहे कि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे सोपे आहे. याला रुग्णालयाच्या बाहेर नेले जाऊ शकते, जिथे संक्रमणाची खूप जास्त प्रकरणे समोर यते आहेत.

काय आहे कंपनीची योजना?

एबॉट कंपनीची एका महिन्यात ५० लाख टेस्ट किटचे उत्पादन करण्याची योजना आहे. अमेरिकन रेग्युलेटर USFDA नेही या टेस्ट किटला मान्यता दिली आहे.

कधीपर्यंत बनणार लस?

कोरोनाच्या उपचारासाठी लस कधी येईल याबाबत काही माहिती मिळालेली नसून अनेक देश कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी औषध बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यशस्वी झालेले नाहीत. याअगोदर पसरलेल्या सार्स व्हायरससाठीही अद्याप कोणतीही लस बनलेली नाही. अशात कोरोनाचे औषध लवकर बनवले जाईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

याचे उत्तर देताना तज्ञ म्हणतात की, जर कोरोना व्हायरसवर उपचार आला तर भविष्यात याचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. येणाऱ्या काळात या महामारीपुढे जगाला गुडघे टेकायचे नसतील तर या व्हायरसवर औषध बनवणे आवश्यक आहे.