Abdul Sattar | शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणायचं का? अब्दुल सत्तार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Abdul Sattar | महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षानिमित्त केली आहे. यावर राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

मुनगंटीवार यांच्या घोषणेवर सत्तार यांनी गोलगोल प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार यांनी म्हटले की, हॅलोसुद्धा चांगले आहे. वंदे मातरम ही चांगले आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगले आहे. मुनगंटीवार यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. (Abdul Sattar)

 

सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर संबंधित घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, वंदे मातरम (Vande Mataram) हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो या विदेशी शब्दाचा त्याग करून
त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम म्हणत संभाषण सुरू करणार आहोत.
1800 साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करत आहोत.

 

Web Title :- Abdul Sattar | abdul sattar on compulsion of vande mataram replacing hello in government offices

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा