Abdul Sattar | ‘दारु घेता का?’, अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची ‘दारु पे चर्चा’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे राज्यात ओल्या दुष्काळाची मागणी जोर धरत आहेत. त्यासंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पाहणी दौरा सुरु केला आहे. पण एका ठिकाणी थांबून चहापान करताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चक्क दारुवर चर्चा करताना आढळले आहेत. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली होती. पण त्यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अद्याप तशी परिस्थिती नाही, असे म्हंटले होते. त्यामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. आता पुन्हा एकदा ते अशाच एका वादात सापडले आहेत आणि त्यांच्यावर लोकांचा रोष वाढला आहे. अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारुच्या गप्पा मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकारी आदी लोक एका ठिकाणी चहा घेत आहेत.
यावेळी कृषीमंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना विचारले दारु घेता का? त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे उत्तर दिले आहे की, हो. कधी कधी घेतो.
जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा (Radha Vinod Sharma) आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड प्रसारीत होत आहे.

 

यापूर्वी औरंगाबाद दौरा करुन शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील पिकाची नासाडी पाहिली होती.
व त्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

 

Web Title :- Abdul Sattar | agriculture minister abdul sattars controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Terence Lewis | मला मॅसेजद्वारे शिवीगाळ केली…, नोरा फतेहीला चुकीचा स्पर्श केल्याच्या प्रकरणात कोरियोग्राफरचा खुलासा

Aaditya Thackeray | गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत; शेतकर्‍यांच्या बांधावरुनच थेट आदित्य ठाकरेंनी सुनावले

Keshav Upadhye | ‘वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!’ केशव उपाध्ये यांची टीका