नशीबवान ! वाढदिवस अन् नववर्षापुर्वीच मिळालं ‘मातोश्री’कडून गिफ्ट, पक्षांतर करून मंत्री बनले अब्दुल सत्तार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या ३४ दिवसानंतर आज मंत्रिमंडळ विस्तारात होणार आहे. या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ३६ नेत्यांची वर्णी लागली आहे. त्यात मराठवाड्यातून शिवसेनेकडून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळणार आहे. विशेष म्हणजे १ जानेवारीला सत्तार यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच मंत्रिपदाच्या निम्मिताने ‘मातोश्री’कडून सत्तर यांना अनोखं गिफ्ट मिळाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात औरंगाबादमधून आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरे यांच्या नावाचा समावेश होता. मात्र आज विधानसभा आवारात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदारकी मिळवणारे अब्दुल सत्तार हे विविध कारणांनी राजकरणात नेहमीच चर्चेत असतात. आघाडी सरकारच्या काळातही सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेल्या आमदारांपैकी एकमेव मुस्लीम आमदार म्हणून सत्तार ठरले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/