Abdul Sattar | ‘शिंदे-फडणवीस 18-18 तास काम करतात, तर उद्धव ठाकरे…’ – अब्दुल सत्तार

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे 18-18 तास काम करतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना ते किती काम करायचे, हे माहीत नाही असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी लगावला आहे. जालन्यात स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) ध्वजारोहणानंतर (Flag Hoisting) झालेल्या पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बोलत होते.

 

टीईटी घोटाळ्यामध्ये (TET Scandal) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलांची नावं आली होती. पण टीईटी घोटाळा मीडिया ट्रायल होती. तो विषय संपला आहे, असे सत्तार यांनी सांगितले. मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर शिंदे गटाला (Shinde Group) फक्त झाडी आणि डोंगर मिळाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी केली होती. त्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार म्हणाले, विरोधकांनी जसे चष्मे लावले तसं त्यांना दिसतं. आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पडू असं सत्तार म्हणाले.

राज्यातील शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी आता फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणतील,
अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.
अब्दुल सत्तार यांना मुनगंटीवार यांच्या या निर्णयाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हॅलो चांगलं आहे,
वंदे मातरमही चांगलं आहे आणि गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगलं आहे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

 

Web Title :- Abdul Sattar | cm eknath shinde devendra fadnavis work for 18 hours dont know about uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा