Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीची चर्चा करतात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Abdul Sattar | राज्यात परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) धुमाकूळ घातला. त्यामुळे कधी नव्हे ते कृषीमंत्र्यांना एवढे महत्व प्राप्त झाले आहे. पण कृषीमंत्री रोज नवनवीन वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) एका बैठकीत काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीची चर्चा करताना आढळून आले आहेत.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसाणीबाबत आढावा बैठक घेतली.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामे अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. pic.twitter.com/hwQJkK5tZq— Abdul Sattar (@AbdulSattar_99) October 28, 2022
कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गुरुवार (दि. 27 ऑक्टोबर) रोजी परभणीत दुष्काळ पाहणी दौरा केला. यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये ते चक्क काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. टेबलवर ठेवलेल्या काजू आणि बदामाचे फोटो आता समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चहोबाजुंनी टीका होत आहे. त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा फक्त औपचारिकता होता का, असा प्रश्न विचारला जात आहे. परभणी जिल्हा दौऱ्यावर त्यांनी जिंतूर तालुक्यातील मालेगाव आणि परभणी तालुक्यातील असोला येथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेती पिकांच्या नुकसानीची तीव्रता जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती.
एकीकडे राज्यातील शेतकऱ्यावर पाणी पिऊन दिवस ठकलायची वेळ आली आहे, तर दुसरीकडे कृषीमंत्री काजू-बदाम आणि मनुके चघळत आढावा बैठकी घेत आहेत.
त्यामुळे शेतकरी आणि सामान्य माणसांमध्ये संतापची लाट उसळत आहे.
मागे देखील विरोधी पक्षांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले होते.
ओला दुष्काळ जाहीर करण्याएवढा पाऊस झालेला नाही, असे सत्तार म्हणाले होते.
Web Title :- Abdul Sattar | during the drought review meeting agriculture minister abdul sattar eating cashew nuts photo went viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर