Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे मागील काही दिवसांपासून सातत्याने आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) पप्पू म्हणून टीका करत आहेत. यावरुन ठाकरे गटाकडून अब्दूल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाणार असून येत्या 7 तारखेला ते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात (Sillod Constituency) जाणार आहेत. खुद्द अब्दुल सत्तार यांनीच माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली असून तेव्हा कोणाच्या सभेला किती गर्दी होते हे कळेलच, असं सत्तार म्हणाले.

शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) पडलं आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपचं (BJP) नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. त्यातच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू असा उल्लेख केल्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगताना दिसत आहे.

ठाकरे गटाकडून 40 बंडखोर आमदारांविरोधात मिशन 40 सुरु करण्यात आले आहे,
अशी विचारणा पत्रकारांनी केली असता अब्दुल सत्तार यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं.
कुणी कोणतंही मिशन चालू केलं, तरी माला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी जे मिशन देतील,
तेच अंतिम असेल. माझ्या मतदारसंघातही नंबर दोनचे पप्पू येणार आहेत. ते जेव्हा माझ्या मतदारसंघात येतील तेव्हा कोणाच्या सभेला किती गर्दी येईल ते दिसेल, असं सत्तार म्हणाले.

Web Title :-  Abdul Sattar | eknath shinde group mla abdul sattar mocks aaditya thackeray shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

Chandrashekhar Bawankule | राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा, म्हणाले- ‘यापुढे खोटारडेपणा केला, तर…’