Abdul Sattar | शिवसेनेतून आणखी 5 आमदार, 2-3 खासदार शिंदे गटात येणार असल्याचा अब्दुल सत्तारांचा दावा!

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – आणखी 5 आमदार (MLA) आणि 2-3 खासदार (MP) शिंदे गटात (Shinde Group) येणार आहेत, असा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी परभणी (Parbhani) येथील जाहीर सभेत बोलताना केला आहे. सत्तारांचा हा दावा खरा आहे की पोकळ, याबाबत चर्चेला जोर चढला आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्याच्या (Marathwada) दौर्‍यावर आहेत.

 

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) भाषणात म्हणाले की, आम्ही 40 आमदार अधिक 10, त्यात 5 आमदार आणखी येणार आहेत. यापूर्वी 10 खासदार होते नंतर 12 खासदार झाले आता 13 झाले. दोन-तीन आणखी येणार आहेत. तरी हे लोक असली-नकली असे सांगत आहेत. मग हे येणारे काय वेडे आहेत का? आता गल्ली-बोळात फिरत आहेत. अगोदरच फिरले असते तरी ही वेळ आली असती का?

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना सत्तार म्हणाले, हे कशामुळे झाले, घरात बसल्यामुळे झाले.
आज तुमची मैदानात उतरण्याची तयारी, लोकांना आसमान दाखवण्याचे स्वप्न पाहत आहात, मग अडीच वर्षे काय केले? मुख्यमंत्री हे छोटे पद नाही.
तो किती शक्तीशाली असतो याचा अंदाज मी लावू शकतो. ज्यावेळी होते त्यावेळी काही दिले नाही, आता नाहीत तर काय देणार? तुमची सत्ता येण्याचे स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही.

 

काल परभणीत अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी (Shiv Sainik) केला असता,
सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचे म्हणणे ऐकले आणि त्यांचे निवेदनही स्वीकारले.

 

Web Title :- Abdul Sattar | five more mlas and two to three mps will join the shinde group abdul sattars big claim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खडकीत पूर्व वैमनस्यातून दोन गटात राडा; चाकूने परस्परावर वार, 11 जणांना अटक

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा