अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा राजीनामा आलेला नाही, शिवसेनेचे नेते अनिल देसाईंनी सांगितलं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन वेळेवर काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सर्वत्र येत होत्या मात्र याबाबत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना विचारले असता अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा राजीनामा आला नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.
त्यामुळे आता सत्तार यांनी खरंच राजीनामा दिला की हे केवळ एक प्रकारचे दबाव तंत्र आहे हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातम्या येताच अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची भेट घेत त्यांची समजूत घालण्याचा देखील प्रयत्न सुरु केला असल्याचे समजते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत काहीही माहित नसल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले होते. त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आमदारकीचा देखील राजीनामा देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकीकडे शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी निर्माण होत असताना अशा नाराजी दबाव तंत्राला देखील सामोरे जावे लागत आहे. तर दिवसभरात अशा अनेक बातम्या येतील असे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार तर राज्यात स्थापन झाले आहे मात्र खातेवाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारमध्ये निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे शिवसेनेला खूपच जड जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कोणताही निर्णय घेताना महाविकासआघाडीला वेळ लागत आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- मेहनत करूनही ‘सिक्स पॅक अॅब्स’ होत नाहीत ? मग ‘या’ 5 टिप्स जाणून घ्या
- मच्छरांबद्दलच्या ‘या’ 6 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घ्या
- आठवड्यातील ‘हा’ वार आहे सर्वात ‘डिप्रेसिंग’, जाणून घ्या 4 कारणे
- ‘किडनी स्टोन’ असताना ‘या’ 8 पदार्थांचे सेवन पडू शकते महागात !
- ‘या’ 5 गोष्टी आहेत डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर
- तासनतास बसून काम केल्याने होतात ‘या’ 4 समस्या, जाणून घ्या
- जिभेच्या 5 प्रकारावरून ओळखा तुम्हाला कोणता आजार झालाय