Abdul Sattar | उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणून त्यांना कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला, अब्दुल सत्तारांचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Uddhav Balasaheb Thackeray) गट आणि बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे) Eknath Shinde गट यांच्यात मोठे शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिवसेनेकडून केलेल्या टीकेवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उत्तर दिले आहे. सत्तेतून तडीपार झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) महाविकास आघाडीला Maha Vikas Aghadi म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचे त्यांचे भाषण तुफान चर्चेत आहे. त्यामुळे त्या सध्या शिवसेनेच्या स्टार नेत्या बनल्या आहेत. त्यांनी ठाण्यात देखील भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यवर टीका केली. त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गेले अनेक दिवस शिंदे यांच्या गटाकडून त्यांच्यावर कोणीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. शिंदे गटाकडून त्यांच्या टीकेवर कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला सर्व लक्षात येत आहे. मुख्यमंत्री संयमी आहेत. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. सत्तेतून तडीपार झाल्याने त्यांचे सर्वांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (Indian Communist Party)
देखील पाठिंबा दिला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
अंधेरीच्या निवडणुकीत (Andheri By Election) ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात मोठी लढत होणार आहे.
यावर अब्दुल सत्तार म्हणाले, संभाजी ब्रिगेड आणि कम्युनिस्ट यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणून पाठिंबा दिला आहे. हे सर्व त्यांनी हिंदुत्व सोडले म्हणून होत आहे.
आणि त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आहे.
येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच खरे हिंदुत्ववादी असतील.

Web Title :- Abdul Sattar |his mental balance was disturbed by the lost of power abdul sattar told critics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा