Abdul Sattar In Jalna | पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी महिलेनं थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनाच अडवलं; जालन्यातील प्रकार

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Abdul Sattar In Jalna | पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी एका महिलेनं थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना अडवलं. यामुळं एकच गोंधळ उडाला. सोमवारी जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. (Abdul Sattar In Jalna)

 

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे. सोमवारी जालन्यात झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. झेंडा वंदन झाल्यावर सत्तार आपल्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असता रिमा यांनी त्यांना अडवलं. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. पोलीसही गडबडून गेले. रिमा यांनी आरोप केला आहे की, जालना शहरात एका दांपत्याचं स्टेशनरीचं दुकान होत. ते दुकान रिकामं करण्यासाठी दुकान मालकानं पोलिसांना सुपारी दिली आणि दुकानातला 15 लाखांचा माल पोलिसांनीच परस्पर लंपास केला. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू (Sub Divisional Police Officer Niraj Rajguru) यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप रिमा यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सत्तार यांनी प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले. (Abdul Sattar In Jalna)

 

रिमा यांनी सांगिलते की, आम्ही कृषीमंत्र्यांना अडवलं कारण, जालन्यात काळोख पसरला आहे. आणि या काळोखावर मात करण्यासाठी आम्ही त्यांना कंदील देऊन उजेडाची जाणीव करून देणार होतो परंतू आमचा कंदीलच जप्त करण्यात आला. देश स्वतंत्र झाला असला तरी, आम्ही मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहोत. खाकी गुंडागर्दीचे अनेक प्रकार घडत आहेत.
इथं जनसामान्यांसाठी वेगळा आणि खाकी वर्दीसाठी वेगळा कायदा आहे. असा आरोप ही रिमा यांनी केला.

 

Web Title :- Abdul Sattar In Jalna | women stop agriculture minister abdul sattar in jalna to complaint against police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा