Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा खळबळजनक दावा, म्हणाले-‘आमदार अमोल मिटकरी आमच्या संपर्कात’

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) आणि शिवसेना Shivsena (शिंदे गट) सरकारमधील अनेक नेते आणि शिंदे गटातील (Shinde Group) काही बंडखोर आमदार (Rebel MLA) आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी त्यांना टोमणा लगावला आहे. यावेळी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खळबळजनक दावा देखील केला आहे.

 

मिटकरी आमच्या संपर्कात

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मिटकरींना एकदा तपासावे लागेल, त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे नेले आणि तपासले, की निश्चितपणे त्यांच्यात काय फॉल्ट आहे, ते कळेल. राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्याकडे येतात. खरतर अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा सत्तार यांनी केला. ते आज अकोला (Akola) दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

 

काय म्हणाले मिटकरी ?

मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते.
एवढेच नाही तर मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आणि आम्हाला मंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही.
त्यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) सोडून येण्याच्या मन:स्थितीत आहोत, असे जवळपास 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे मिटकरी यांनी म्हटले होते.

 

Web Title : –  Abdul Sattar | maharashtra minister abdul sattar slam ncp mla amol mitkari over his criticism ek diwas balirajasathi campaign

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा