Abdul Sattar | अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, 24 तासात हकालपट्टी करा अन्यथा…; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबईतील घरावर दगडफेक (Stone Throwing) करत खिडकीच्या काचा फोडल्या.

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रिमंडळातून (Cabinet) हकालपट्टी करावी, अन्यथा सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात तपासे म्हणाले, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या
राजकीय संस्कृतीचा एक धागा गेल्या अनेक वर्षांपासून जपला आहे. यामध्ये विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपलं आहे.
असं असताना आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे
यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत अशोभनीय आणि असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध करतो.

खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे.
त्यामुळे अब्दुल सत्तार यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल,
असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रातून दिला आहे.

Web Title :- Abdul Sattar | ncp spoke person mahesh tapase wrote letter to cm eknath shinde abdul sattar dismiss supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दिवसाढवळ्या तरूणीचा विनयभंग; देहूरोड परिसरातील घटना

Abdul Sattar | टीकेनंतर अब्दुल सत्तार आपल्या वक्तव्यावर ठाम, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले-‘मग त्यांना…’